‘या’ मंत्र्यांना हवे खातेबदल

‘या’ मंत्र्यांना हवे खातेबदल

गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गदारोळ माजवलेल्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात मंत्रिपदासाठी आता चुरस पाहायला मिळत असून शिंदे गटातील मंत्री विविध मंत्रिपद बदलीसाठी मागण्या करीत आहेत.

शिंदे समर्थक आमदारांमध्ये भरत गोगावले यांना मंत्रिपद हवे आहे. संजय शिरसाट यांनाही मंत्रिपद हवे आहे. शिरसाट यांना प्रदीप जैस्वाल यांचे आव्हान आहे. विदर्भातून आशिष जैस्वाल मंत्रिपदासाठी जोर लावतायत. महिलांमध्ये यामिनी जाधव आणि लता सोनावणे इच्छुक आहेत. याच्या जोडीला शिंदे समर्थकांमध्ये विद्यमान मंत्र्यांना खाती बदलून हवी आहेत. डॉ. तानाजी सावंत यांना आरोग्य ऐवजी सार्वजनिक बांधकाम खाते हवे आहे. दीपक केसरकारांना शालेय शिक्षण खात्यातून सुटका हवीय. संदीपान भुमरे यांना आणखी वजनदार खात्याची अपेक्षा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version