खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात १३ श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. खारघरमधील श्री सदस्यांचे मृत्यू त्यादिवशीच्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाले, असा दावा काही मंत्र्यांनी केला होता. २५ लाखांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी १३ कोटी रुपये खर्चाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, तरीही कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे १३ श्री सदस्यांना नाहक जीव गमवावा लागला होता.
त्यामुळे या संपूर्ण घटनेसाठी प्रशासनाला दोषी ठरवून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. या सर्व गोष्टींची दखल घेऊन राज्यसरकारने संपूर्ण घटनेची वस्तूस्थिती तपासण्यासाठी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची एक सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला.
आता या प्रकरणात सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या दुर्घटनेतील अद्याप १० रुग्ण वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत. १४ मृतांची ओळख सर्व मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. ही समिती संपूर्ण घटनेची वस्तूस्थिती तपासून एक महिन्याच्या मुदतीत आपला अहवाल सादर करणार आहे. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समितीकडून राज्यसरकारला शिफारशी करण्यात येणार आहे.
या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. या संदर्भात सीएमओने ट्विट करुन माहिती दिली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती स्थापित करण्याचा मह्त्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.
खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा राबविण्यात आली. त्याचा खर्च दाखवण्यात आला नाही याची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.