चोरट्याने चोरीनंतर ‘हा’ पुरावाच पळवला…

चोरट्याने चोरीनंतर ‘हा’ पुरावाच पळवला…

सांगलीतील एका चोरट्याचा चाणाक्षपणाचा चांगलाच फटका व्यापाऱ्याला बसला आहे.

या चोरट्याने दुकानातील चोरीनंतर सीसीटीव्हीचा डिव्हीओही पळवला आहे त्यामुळे आता चोरटे शोधायचे तरी कसे? असा प्रश्न पडला आहे.

सांगलीतील कॉलेज कॉर्नरसमोरील हरिहर कलेक्शन चोरट्याने रात्री फोडले आणि त्यातील रोकड, साहित्य लंपास केले.

विशेष म्हणजे त्या चोरट्याने केलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद तर झाली खरी मात्र फुटेज ज्या डिव्हीआरमध्ये सेव्ह झाले आहे तो डिव्हीओच चोरट्याने चोरी झाल्यावर पळवून नेला, त्यामुळे पोलीस आणि दुकान मालकांची पंचायत झाली आहे.

या चोरीच्या घटनेत चोरट्याने 40 हजाराची रोकड आणि सोन्याचांदीच्या वस्तू लंपास करून पुन्हा चोरीची फुटेज असणारा डिव्हीआरही पळवून यंत्रणेला चोर शोधण्याचे मोठे आव्हान दिले आहे.

या प्रकारामुळे सांगली शहरात एकच खळबळ माजली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version