मालेगावच्या उर्दू घराला आता कर्नाटकातल्या मुस्कानचं नाव

मालेगावच्या उर्दू घराला आता कर्नाटकातल्या मुस्कानचं नाव

मालेगावचे तत्कालीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांच्या आठ कोटी आमदार निधीतून उभारलेल्या उर्दू घरास शैक्षणिक अभ्यासिकेला कर्नाटकमधील मुस्कानचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मालेगाव मनपा महासभेत केला जाणार असल्याची माहिती मालेगावच्या महापौर ताहिरा शेख यांनी दिली आहे.

हिजाबचे समर्थन करत हिजाब घालण्याचा विरोध धुडकावून लावणाऱ्या धाडसी मुस्कानच्य कौतुकासाठी हा निर्णय घेतला असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले आहे. हिजाबच्या समर्थनार्थ मुस्कान या विद्यार्थ्यीने सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे मुस्कानच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी उर्दू घरास तीचे नाव देण्याचा ठराव मनपा महासभेत केला जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version