राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता त्यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पाने जोडण्यात येतील. या पानांवर विद्यार्थ्यांकडून वर्ग कार्यांमध्ये शिक्षक शिकवत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी करायच्या आहेत.
राज्यातील सरकारी स्थानिक,स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने समाविष्ठ करण्यासाठीच्या धोरणासंबंधीचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. पाठ्यपुस्तकात वह्या जोडण्याचा निर्णय तूर्तास सरकारी स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आदी शाळांमध्ये असला तरी खाजगी शाळांना त्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.