युक्रेनच्या मारियुपोल शहराची परिस्थिती गंभीर

युक्रेनच्या मारियुपोल शहराची परिस्थिती गंभीर

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा गेल्या १२ दिवसांपासून कायम आहे. रशियाकडून युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. रशियाकडून सुरू असलेल्या या युद्धात युक्रेनमधील मारियुपोल शहराची परिस्थिती गंभीर झाली आहे. मारियुपोल शहरामध्ये अन्न, पाणी, औषधे यांसह अनेक साहित्यांचा तुटवडा भासवत आहे.

रशियाकडून युक्रेनच्या मारियुपोल शहरात सतत गोळीबार सुरू आहे. या गोळाबारामुळे शहरात अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला आहे. अन्न, पाणी, औषधांसह सलग पाचव्या दिवशी नागरिकांना विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच सतत होणाऱ्या गोळीबारामुळे नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे अशक्य झाले आहे.

शहरातील नागरिक आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये ११ तासांच्या युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र, रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे हा मानवतावादी कॉरिडॉर त्वरित बंद करावा लागल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी युद्धविराम मोडला गेल्याने मारियुपोलमधील नागरिकांना बाहेर काढण्याचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी ठरला असल्याचे रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीने म्हटले आहे. दरम्यान, रशियन सैन्याकडून गोळीबार सुरू असल्याने येथे ग्रीन कॉरिडॉर बांधता येणार नाही, असे युक्रेनच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version