शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंड पुकरला आहे. शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांची सहकारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. त्यामुळे मविआच्या निर्णयाविरोधात बंडखोर आमदारांनी दाद मागितली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे.
गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. pic.twitter.com/gUn4JEyIJq — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात सामील झालेले आमदार आसामधील गुवाहाटी येथे आहेत. शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार मोठं संकट कोसळलं आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदेंच्या गटात आमदारांच्या संख्येत वाढ होत आहे. सुरुवातीला शिंदे गटात १२ आमदार होते. त्यानंतर शिंदे गटातील शिवसेना आमदारांची संख्या ४०वर पोहचली आहे. तर या बंडाला १० अपक्ष आमदारांनीही साथ दिली आहे. त्यामुळे बंडातील आमदारांची संख्या ५०वर पोहचली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.