आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये वाढती बेरोजगारी, युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात २९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पार पडले. मात्र, यावेळी देशातील कोरोना परिस्थितीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सकाळी ११ वाजल्यापासून सलग चालणार आहे. याआधी, अर्थसंकल्पयी अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारी रोजी पार पडला होता. त्यानंतर आता देशातील उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version