रिक्षा चालकाने महिलेला नेले फरफटत

रिक्षा चालकाने महिलेला नेले फरफटत

कोल्हापूर, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: रिक्षा भाडे आकारणी वादातून रिक्षाचालक तेथून वेगाने निघून गेला. रिक्षाच्या मागील पिवळ्या सेफ्टी गार्डमध्ये महिलेची साडी अडकली. यामुळे रिक्षाने सुमारे शंभर मीटरपर्यंत महिलेला रस्त्यावरून फरपटत नेले. सायबर चौक ते माऊली चौक दरम्यान गुरुवारी दुपारी ही घटना घडली. यात मीना धनपाल साठे (वय ६२, गंभीर जखमी झाल्या.

मीना यांचा मुलगा किरण धनपाल साठे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोमीनवर गुन्हा दाखल केला. मीना यांनी गार्डला धरल्यामुळे त्यांचे डोके रस्त्यावर घासले नाही; एका बाजूला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. सायंकाळनंतर अनेकांच्या मोबाईल स्क्रिनवर हा व्हिडिओ फिरत होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version