गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याचा भाव वधारला

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याचा भाव वधारला

सोनं कधी स्वस्त होणार अशी वाट पाहणाऱ्यांसाठी आता सोन्याने चांगलाच झटका दिला आहे. सोन्याने आता तब्बल ६० हजारांचा भाव गाठला आहे. RTGS GST चा दर हा तब्बल ६०२८३ इतका झाला आहे. त्यामुळे सोनं विकणाऱ्यांसाठी सोन्याचे दिवस आले आहे, तर गुंतवणूक करणाऱ्यांचा खिसा आता चांगलाच खाली होणार आहे.

महाराष्ट्रातील लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. मराठी नववर्षारंभ मानला जाणारा गुढी पाडवा हा सण काही दिवसांवर आला आहे. या दिवशी महाराष्ट्रात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष आहे.

एकीकडे महागाईने सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता लग्नसराईचे दिवस येऊन ठेपले असताना सोन्याला चांगलीच झळाळी चढली आहे. सोन्याचे दराने आता ६० हजारांचा दर गाठला आहे. RTGS GST दरानुसार सोन्याचा भाव हा आता ६० हजार २८३ इतका झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version