पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट

पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट

राज्यातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस उकाडा वाढणार असल्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात मुंबईसह उपनगरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मार्च महिन्यातच कडकडीचे ऊन्ह सोसावे लागणार आहे.

राज्यात मुंबईसह अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पालघर, रायगड तसेच ठाण्यामध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मुंबईत पुढील ४८ तासांमध्ये कमाल तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने ट्विट केले की, मुंबई उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण: येत्या २ दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअसवर व कमाल तापमान किमान ३७ अंश सेल्सिअस असावे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version