नालासोपारा भागात साचलं पाणी

नालासोपारा भागात साचलं पाणी

केवळ दोन ते तीन दिवसांच्या पावसात वसई विरार आणि नालासोपारा शहरांना नद्यांचं स्वरूप आले आहे. तर नालासोपारा मधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुसळधार पाऊसामुळे सखल भागात गुढग्याच्या वर पाणी साचले आहे . यांचा परिणाम वाहतूक कोंडीवर देखील झाला आहे. या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. फक्त दोन दिवसाच्या पावसात वसई विरार शहर पाण्याखाली गेले आहे.

या पावसाळ्यातील हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे.मुंबई महानगरपालिकेने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसं ट्वीट बएमसीने केले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे तर यांचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे.वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर लोकल ट्रेनचाही खोळंबा झाला आहे. तर सलग दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे लोकल वर ही याचा परिणाम झाला आहे. दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी उशीर होत आहे , यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आत्ताच सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version