सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचालींना वेग आला आहे . उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यांनंतर राजकीय हालचाली चालू झाल्या आहेत.त्याच अनुषंगाने काही पत्र एकनाथ शिंदे राज्यपालांना देणार आहेत तर ते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. आता राजकीय घडामोडींना वेग आला असून आता सत्ता स्थापनेसाठी कोणते चित्र काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.आत्ताच आलेल्या माहिती नुसार एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणविसांची भेट घेणार आहेत शिंदे फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आली आहे. दुपारी ३ ते ३:३० च्या दरम्यान ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये राज्यपालांच्या भेटी अदाही चर्चा होणार आहे. त्यांनतर शिंदे फडणवीस एकत्र राज्यभावनात जाणार आहेत.
आत्ता पर्यंत सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाने स्पष्ट भूमिका केली नव्हती मात्र , कालच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर त्याच बरोबर त्यांनी विधान परिषद सदस्यत्व सोडले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हंटले आहे .बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर चित्र स्पष्ट झाल्यांनतर राज्यपालांना भेटायला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलॆ. आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या भेटी नंतर काय चित्र निर्माण होणार याच्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.