मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोडला आहे. यासाठी देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगळावेगळा मजकूर देत पंतप्रधानांना डिवचले आहे. विविध विक्रम करणारे पंतप्रधान अशा आशयाचे बॅनर मनसेने शिवसेना भवन येथे लावले होते. मात्र काही काळातर ते बॅनर पोलिसांनी हटवले आहे. परंतू मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ते बॅनर एक्सवर पोस्ट करत मोदींना मिश्किल टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोडला आहे. 26 मे 2014 रोजी प्रथमच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आणि 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर, मोदी यांनी 10 जून 2026 रोजी सलग 4,399 दिवसांचा टप्पा पूर्ण केला. जो नेहरूंच्या 4,398 दिवसांपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, मनसेने लावलेल्या बॅनरवर विक्रमवीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांचे अभिनंदन असे नमूद करण्यात आले आहे. सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केल्याबद्दल मोदीजी आपले मनसे अभिनंदन असा मजकूर लिहित सध्या भेडसावत असलेल्या समस्यांवर देखील भाष्य केले आहे. त्याचबरोबर एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम मोदींनी केल्याचा बॅनरवर उल्लेख केला आहे.
"बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही"कुठल्या व्यक्तीने कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं या पेक्षां किती चांगलं काम केलं हे महत्वाचं ,नाही का ? pic.twitter.com/NyER9EJAwQ — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.