प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत होणार बैठक

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत होणार बैठक

प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद शांत झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बुधवारी मुंबईतील टिळक भवनात होत आहे.

राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे. ही बैठक पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत नुकत्याच झालेल्या अमरावती पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले धीरज लिंगाडे व नागपूर शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले सुधाकर आडबाले यांचा सत्कारही या वेळी होईल.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version