‘कोकणातील सभा अतिविराट होणार’

‘कोकणातील सभा अतिविराट होणार’

उद्धव ठाकरे यांची कोकणात जाहीर सभा होणार आहे. या सभेत माजी आमदार संजय कदम उद्धव गटात प्रवेश करणार आहेत. या सभेविषयी आणि पक्षप्रवेशाविषयी संजय राऊत यांनी दावा केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या कोकणातील सभेविषयी, “कोकणातील सभा अतिविराट होणार”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. “शिवसेनेबाबत कोकणात प्रेम आहे” “अशाच सभा महाराष्ट्रभर होतील खेडनंतर मालेगावमध्ये सभा होईल”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
तसेच, संजय कदम यांच्या पक्षप्रवेशावर, “संजय कदम मुळचे शिवसैनिकच आहेत” “खेड आणि खेड आसपासच्या जागा जिंकण्यासाठी यांच्या पक्षप्रवेशाचा नक्कीच फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गेल्यानंतर प्रथमच कोकणामध्ये उद्धव गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. रविवारी, ५ मार्च, २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता, रत्नागिरी, खेड येथील गोळीबार मैदानात ही जाहीर सभा होणार आहे.
या सभेत खेड- दापोली मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा उद्धव गटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे प्रमुख विरोधक आहेत. संजय कदम यांनी उद्धव गटात प्रवेश केल्यास योगेश कदम यांच्या मतदारसंघात उद्धव गटाला बळ मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मराठी मुस्लिम महासंघाच्यावतीने देखील फतवा काढून संपूर्ण रत्नागिरीतील मुसलमानांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version