सांगलीत कृष्णा नदीची पातळी १८ फुटावर

सांगलीत कृष्णा नदीची पातळी १८ फुटावर

सांगली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे .कोल्हापूर, सांगली तसेच सांगली जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.गेली चार दिवस सुरू असणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा काठावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एका रात्रीत कृष्णा नदीची पाणी पातळी १२ वरून १८ वर पोहचली आहे. अजूनही पावसाचा जोर सुरूच असल्याने कृष्णा वारणा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पातळी १८ फुटावर जाऊन पोचली आहे. एकाच रात्री मध्ये पाणी पातळीत ५ टक्कयांनी वाढ झाल्याचे दिसत आहे.

मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा काठावर पूर परिस्थती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे, या वाढत्या पाणी पातळीमुळे कृष्णा काठ लगतच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती दिसत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सातारा आणि कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूर शहरात हलक्या सरी पडल्या असून १८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यात ११.४ मिमी पाऊस झाला आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला आहे.सांगली सोबतच राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अनेक परिस्थितीना सामोरे जावे लागत आहे, पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचे स्थलांतरित देखील करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version