मुंबई, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान ३ मोहिमेअंतर्गत रविवारी महत्वाची प्रक्रिया पार पाडली. चांद्रयान ३ ने रविवारी रात्री ११ वाजता ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून हे यान चंद्राच्या आणखी जवळ गेले आहे. या यानाने पहिला पहिला फोटो आणि व्हिडिओ इस्रोला पाठवला. हा व्हिडिओ आणि फोटो इस्रोने ट्विटर पेजवर प्रसिद्ध केला आहे.
चांद्रयान आता चंद्राभोवती 170×4313 किलोमीटर कक्षेमध्ये फिरत आहे. हे चांद्रयान आता या कक्षेमध्ये चंद्राभोवती फेरी मारणार असून ९ ऑगस्ट रोजी ते इस्रोच्या बंगळुरु येथील सेंटर वरुन आणखी आतल्या कक्षेत पुढे पाठवले जाईल. रविवारी रात्री ११ वाजता चांद्रयान ३ ने ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया पार पाडत बंगळुरु येथील सेंटरमध्ये इस्रोने दिलेल्या कमांडप्रमाणे चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर यानाने चंद्राचे फोटो आणि व्हिडिओ इस्रोला पाठवले असून हे फोटो आणि व्हिडिओ इस्रोने ट्विटर पेजवरुन प्रसारित केले.
https://twitter.com/chandrayaan_3/status/1688215948531015681?s=20
यापूर्वी शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. या मुळे हळू हळू चंद्रयान चंद्राच्या दिशेने पुढे जात असून २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरवले जाणार आहे. हे यान १४ जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले होते. चांद्रयान चंद्रावर उतरवण्यासाठी दोन महत्वाचे टप्पे राहणार आहे. हे टप्पे यशस्वी पार केल्यावर चंद्रयान हे चंद्रावर उतरवता येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होणार असून ते २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाणार आहे. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास अशी क्षमता असणारा भारत हा जगातील चौथा बनणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.