राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याच्या हत्येचा उलगडा

राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याच्या हत्येचा उलगडा

सांगलीत २०१९ मधील महेश नाईक खून प्रकरणात मोक्कामध्ये जेलमध्ये असलेला आरोपी सचिन डोंगरे याला जामीन होऊ न देण्यासाठी आणि त्याला बाहेर येता येऊ नये यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून नालसाब मुल्ला याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या चौघांनी शुक्रवारी नालसाब रहात असलेल्या ठिकाणची रेकी केली होती. तसेच मुल्ला याच्या हालचालीची माहिती घेतली होती. यानंतर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास या चौघांनी मुल्ला यांच्या वर गोळीबार करीत कोयत्याने हल्ला चढवत तिथून पलयन केले. या चौघांनी नालसाब मुल्ला यांच्या खुनाची कबुली दिली असून सचिन डोंगरे याच्या सांगण्यावरूनच खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version