हिजाब वादातील याचिका न्यायालयाने फेटाळली

हिजाब वादातील याचिका न्यायालयाने फेटाळली

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कर्नाटक न्यायालयाने हिजाब वादातील याचिका फेटाळली आहे. त्यामुळे कर्नाटकातील शाळेतील हिजाब बंदीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हिजाब हा मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे कर्नाटक न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा निर्णय आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्याच्या परवानगीसाठी उडूपीच्या मुलींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय, कर्नाटक न्यायालयाने दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version