जोडप्याला पॅरासेलींग पडली महागात

जोडप्याला पॅरासेलींग पडली महागात

  अॅडव्हेंचरस म्हणजेच साहसी गोष्टींचे व्हिडिओ सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात. या अॅडव्हेंचरर्स व्हिडिओमध्ये पॅराग्लायडींग, पॅरासेलींग, रोप जंपींग, स्काय डायव्हिंग यासारखे अनेक साहसी खेळ खेळले जातात. या साहसी खेळातून अनेकांना आनंद मिळतो. तसेच हे खेळ खेळण्यासाठी जास्तीचे पैसे मोजण्यासही तयार होतात. मात्र काहीवेळा हेच खेळ जीवावरही बेतू शकतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

   सोशल मिडीयावर व्हायरल होणारा व्हिडिओ पॅरासेलींगचा आहे. व्हिडिओत एक जोडपे बोटीला दोरी बांधून पॅरासिलींग करताना दिसत आहेत. हे जोडपे पॅराशुटच्या मदतीने हवेत खूप उंच गेले आणि दरम्यान पॅराशुटची दोरी तुटली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सुदैवाने दोघेही पाण्यातच पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

   सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दीवच्या नागवा बीचचा आहे. जिथे गुजरातच्या जुनागडमधील एक जोडपे रविवारी सकाळी पॅरासेलींग करण्यासाठी पोहोचले होते. अजित काथड आणि सरला काथड असे या पॅरासेलींग करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे. रविवारी सकाळी पॅरासेलिंगसाठी दीवच्या नागोवा बीचवर गेले असता, त्यांच्यासोबत हा अपघात घडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version