IMD Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला; कांदा पिकावर ‘या’ रोगाचं सावट

अनेक ठिकाणी तापमानाचा पारा थेट 15 डिग्री सेल्सियसच्या खाली घसरल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, या थंडीचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
IMD Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला; कांदा पिकावर ‘या’ रोगाचं सावट

IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात हुडहुडी वाढली असून अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा थेट 15 डिग्री सेल्सियसच्या खाली घसरल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, या थंडीचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नाशिकमध्ये 10 वर्षांतील निचांकी तापमान

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. 4 डिसेंबरपासून तापमानाने गेल्या 10 वर्षांतील सर्व विक्रम मोडले असून पारा निचांकी स्तरावर पोहोचला आहे. थंडीची ही लाट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

हेही वाचा – PCMC Election : निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि ठाकरेंना 'दे धक्का'! भाजपने बडा नेता फोडला

कांद्यावर 'मावा' आणि 'करपा'चे संकट

हवामान तज्ज्ञांच्या मते, कडाक्याच्या थंडीमुळे कांदा पिकावर 'मावा' आणि 'करपा' यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. जर वेळीच काळजी घेतली नाही, तर कांद्याची पात जळून पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आता महागड्या औषधांची अतिरिक्त फवारणी करावी लागणार आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

हेही वाचा – BMC Elections Mahayutiv vs MVA : सेना भाजप एकत्र लढण्याची मानसिकता पण…; शिरसाट नेमकं काय म्हणाले?

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

दरम्यान, एककीडे पिकांचे नुकसान होत असताना दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यावरही थंडीचा परिणाम होत आहे. वाढत्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा आणि आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version