थंडीचा हंगाम संपत आलेला असताना देखील धुळ्यात थंडीचा जोर कायम असल्याचे बघावयास मिळाले आहे, धुळ्यात 9.4℃ सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून धुळेकरांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशापेक्षा कमी असल्याचेच बघावयास मिळाले आहे, त्यामुळे थंडीचा हंगाम संपत असताना देखील धुळेकरांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागत आहे.
अशा वातावरणात धुळेकर पहाटे व सायंकाळी जिल्हा क्रिडा संकूलाच्या मैदानावर पायी फिरायला यायला सुरवात झाली आहे. तर तरूणमंडळी नेहमीप्रमाणे व्यायाम व खेळाच्या सरावासाठी येताना दिसत आहेत. शहरात थंडीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी दैनंदिन कामाला सुरवात करण्यापूर्वी थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर, कानपट्टी यांचा वापर सुरू केला आहे. दररोज सकाळी उठून व्यायाम करावा आणि पायी फिरल्यास शरीर सदृढ राहते. यासोबत स्विमिंग केल्यास संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. प्रत्येकाने सकाळी व रात्री जेवणानंतर पायी फिरावे आरोग्यास चांगले असते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.