मुख्यमंत्र्यांचे मानेचे दुखणे पुन्हा बळावले

मुख्यमंत्र्यांचे मानेचे दुखणे पुन्हा बळावले

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचे दुखण पुन्हा बळावले आहे. आज पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. मात्र पंढरपूरच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला दिसला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जुनी पाठदुखी पुन्हा एकदा बळावली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपचारासाठी रुग्णालयात भर्ती होणार का? की घरबसल्या उपचार घेतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाय जड झाले होते. तसेच त्यांच्या मणक्यातही वेदना होत होती. मणका वेदना देऊ लागताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास जाणवू लागला. मुख्यमंत्र्यांचा पाठदुखीचा जुना त्रास पुन्हा एकदा उफाळल्यामुळे डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

  नुकताच बारामतीत पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पायदुखीबद्दल बोलले होते. आणि आजच्या पंढरपूरच्या ऑनलाईन भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या मानेला पट्टा दिसल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मानेचे दुखणे बळावले असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version