खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान शेकडो लोकांना उष्माघात झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या दुर्घटनेत १४ लोक मृत्युमुखी पडले आहेत तर सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या सोहळ्यात दगावलेल्या 14 श्रीसदस्यांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपोर्टनुसार मृत्यू झालेले श्री सदस्यांची पोटं रिकामी होती. मृत्यू होण्याआधी त्यांनी 6 ते 7 तासांपासून काही खाल्लेल नव्हतं. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या जास्त वेळ संपर्कात राहिल्याने त्यांच्या शरीरात पाण्याची नसल्याचं दिसून आलं.
हा कार्यक्रम 16 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते 1.15 या वेळेत झाला आणि 21 लाख श्री सदस्य (आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी) उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी असलेल्या वैद्यकीय बूथच्या माहितीप्रमाणे या कार्यक्रमा-दरम्यान जवळपास 650 जणांना उष्माघातामुळे त्रास झाला. त्याचबरोबर प्रकृती गंभीर झाल्याने जवळपास 60 जणांनी जवळच्या रुग्णालयात धाव घेतली. त्यापैकी 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. 10 श्री सदस्य अजून वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असून, 36 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने श्रीसदस्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्यामुळे समोर बसलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हात ६ ते ७ तास बसून राहावं लागलं. त्यामुळे उष्माघातामुळे त्यातील १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.