जम्मूजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातमध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ५५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. अमृतसरहून कटरा इथं जाणारी बस झझ्झर कोटली इथं दरीत कोसळली. तब्बल ५० फूट खोल दरीच बस कोसळली आहे. बचाव पथकाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. बसमधील सर्व प्रवासी बिहारचे असून ते देवदर्शनासाठी चालले होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.