पहिल्या पावसात पुल गेला वाहून

पहिल्या पावसात पुल गेला वाहून

अमरावतीत गेल्या महिन्यात बांधलेला पुल पहिल्या पावसात वाहून गेला आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील किरजवळा येथील हि घटना आहे. गेल्या महिन्यातील २२ जून रोजी आमदार निधीतून पांदन रस्त्यावरील पुल बांधण्यात आला होता.पुलाचे कामकाज सुरू असताना निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. मात्र कंत्राटदाराने दुर्लक्ष करीत तातडीने पुलाचे बांधकाम केले. दमदार पाऊस झाल्यानंतर पांदन रस्त्यावरील हा पूल वाहून गेला आहे. पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक तलावांमध्ये पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यामधून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे पूल वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या पूलावरुन ये-जा करण्यास देखील त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version