#PulwamaTerrorAttack :शहिदांचे पार्थिव औरंगाबादहून बुलढाण्याला नेणार

#PulwamaTerrorAttack :शहिदांचे पार्थिव औरंगाबादहून बुलढाण्याला नेणार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर गुरुवारी दुपारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला.

या हल्ल्यांत सीआरपीएफचे 40  जवान शहीद झाले.

यात महाराष्ट्रातील नितीन राठोड आणि संजय राजपूत हे दोन जवान शहीद झाले.

हे दोन्ही जवान मूळचे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे आहेत.

या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळगावी बुलढाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दोन्ही शहिद सैनिकांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11 या दरम्यान विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर येईल.

एक पार्थिव हेलिकॉप्टरद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तर दुसरे पार्थिव रस्तामार्गे लोणार येथे जाईल .

महाराष्ट्र सरकारने या दोन जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.

शहीद जवानांच बलीदान वाया जाणार नाही आम्ही जशास तसे उत्तर देऊ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं

 या दोघांच्याही कुटुंबियांनी एकच आक्रोश केला आहे. तसेच मलकापूर आणि लोणार मध्ये शोककळा पसरली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version