जिओ धारकांसाठी आनंदाची बातमी

जिओ धारकांसाठी आनंदाची बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

जिओ युजर्सला कंपनीने मोठे गिफ्ट दिले आहे. युजर्ससाठी प्लॅनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कंपनीने 153 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन अपडेट केला आहे. आणि 153 रुपयांच्या पॅकमध्ये युजर्संना रोज 1Gb हायस्पीड 4जी डेटा मिळणार आहे. रिलान्यस जिओ 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स  लोकल, एसटीडी, रोमिंग दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्रि सब्सिक्रिप्शन देखील मिळणार आहे. या रिचार्जची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असणार आहे.

यापूर्वी जिओ फोन लॉन्च झाला होता. तेव्हा युजर्सला 153 रुपयांच्या रिचार्जमध्ये रोज 500 MB हायस्पीड 4G डेटा मिळत होता. जियो युजर्ससाठी कंपनीने हा प्लॅन अपडेट केला. म्हणजेच युजर्संना अधिक फायदा मिळेल.

जिओ फोन युजर्ससाठी लवकरच दोन छोटे पॅकही लॉन्च होतील. या प्लॅनची किंमत 24 रुपये आणि 54 रूपये आहे. 24 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्संना फ्री कॉलिंग, रोज 500 एमबी 4G डेटा, 20 एसएमएस मिळतील. प्लॅनची व्हॅलिडिटी दोन दिवसांची असणार आहे. याच्या व्यतिरिक्त एक छोटा पॅकही युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. 54 रुपयांच्या पॅकमध्ये पूर्वीप्रमाणेच इतर सुविधा मिळतील. फक्त एसएमएसची संख्या 70 होईल. जिओ फोन युजर्ससाठी 54 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांसाठी असणार आहे. 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version