आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढला

आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढला

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसबीच्या रडारवर आहे. मात्र अखेर आर्यनचा जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला असून आर्यनची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणाची तपासणी मुंबई विभाग एनसीबीचे संचालक समीर वानखेडे करत आहेत. मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह हे आर्यन खानची चौकशी करणार आहेत. तपास निष्पक्ष होण्यासाठी समीर वानखेडे यांना या तपासातून काढण्यात आले असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.

  यावर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी स्वत: आर्यन खानच्या तपास काढून घेण्याची विनंती केली असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version