Monsoon Update : प्रतीक्षा वाढली! हवामान विभागाची चिंता वाढवणारी माहिती; चक्रीवादळाचं नवं संकट घोंघावतयं, वाचा कधी पडणार पाऊस

महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असताना पाऊस लांबणीवर पडला असल्याचे दिसून येत आहे.
Monsoon Update : प्रतीक्षा वाढली! हवामान विभागाची चिंता वाढवणारी माहिती; चक्रीवादळाचं नवं संकट घोंघावतयं, वाचा कधी पडणार पाऊस

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असताना पाऊस लांबणीवर पडला असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या वाटेत निसर्गाने एक मोठं संकट उभं केलं. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची वाटचाली खोळंबली आहे. याचा थेट फटका भारताला बसला असून, मान्सून सध्या श्रीलंकेच्या वेशीवर थांबला आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. परिणामी, आता केरळात मोसमी वारे पोहोचण्यासाठी थेट 1 जून उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा : Prajakt Tanpure : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे करणार भाजपमध्ये प्रवेश, शरद पवार गटाला धक्का; प्रवेशाची तारीखही ठरली

एल निनोचा प्रभाव जागतिक हवामानावर पडला असून त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावरही झाला असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात एकाचवेळी दोन टोकांचे हवामान पाहायला मिळत आहे. सध्या मान्सूनच्या आगमनाबाबत काहीसा संभ्रम आहे. सध्याची सर्व परिस्थिती वाऱ्यांची दिशा आणि त्यांच्या वेगावर अवलंबून आहे. वाऱ्यांची दिशा आणि जोर अनुकूल होताच केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असे हवामान तज्ञ सांगतात. 

यंदा हवामान खात्याने राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्रातही चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. या दोन्ही समुद्रांमधील हालचाली आणि कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता मान्सूनला पुढे खेचण्यासाठी किती मदत करते, यावरच पुढचा प्रवास ठरणार आहे. मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असून, मुंबई आणि उपनगरात प्रचंड दमट आणि उष्ण हवामान राहील, ज्यामुळे उकाडा वाढणार आहे. मराठवाड्यात मात्र पावसाची चिन्हे नसून हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version