School – colleges Holiday : पावसाचा कहर! सर्व शाळा – महाविद्यालयांना आज सुट्टी; डबेवाल्यांची सेवाही बंद

School – colleges Holiday : पावसाचा कहर! सर्व शाळा – महाविद्यालयांना आज सुट्टी; डबेवाल्यांची सेवाही बंद

मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक, सार्वजनिक सेवा, शाळा-काॅलेज सर्वांवरच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याने आज, 6 जुलै रोजी काही भागांमध्ये रेड तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यामुळे येथील प्रशासनाने शाळा-काॅलेजला सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान मुंबई, पालघर, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा येथील प्रशासनाने शाळा आणि काॅलेजला सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक जारी केले आहे. 

हेही वाचा : Pune Landslide: मावळमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे घरावर दरड कोसळली; संपूर्ण कुटुंब अडकल्याची शक्यता, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून गेल्या 24 तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. सातारा तालुका पाटण महाबळेश्वर जावली वाई या तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून अनावश्यक घराबाहेर पडू नका, असे प्रशासकीय यंत्रणेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.

शिवाय, गेल्या दोन दिवस मुंबईमध्ये जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पाणी भरला आहे. हवामान खात्याने जोरदार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे. पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी आपले सेवा बंद ठेवली आहे. अनेक डबेवाल्यांच्या घरामध्ये पाणी गेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे अशा परिस्थितीत डबेवाले सायकल घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून डबेवाल्याने आज, सोमवारी आपली सेवा मुंबईमध्ये बंद ठेवली असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर सांगितले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version