ठाण्यातील रस्त्यावर बसवलेले पेव्हरब्लॉक दोन दिवसांत उखडले; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

ठाण्यातील रस्त्यावर बसवलेले पेव्हरब्लॉक दोन दिवसांत उखडले; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

मंगळवारी ठाण्यातील विटावा सब वे पुलावरील पेव्हरब्लॉक निघाल्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विटावा सब वे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

मंगळवारी दुरुस्तीनंतर हा सब वे वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच दिवशी रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळं मंगळवारी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

दरम्यान, न्यायालयानं रस्त्याचे काँक्रिटीकरण करण करण्याचे आदेश देऊन सुद्धा रस्त्यावर पेव्हब्लॉक बसवून काम करण्यात आलं असा आरोप मनसेचे पदाधिकारी सुशांत सुर्यराव यांनी केला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version