Thane-Nashik Highway: प्रशासनाचा मोठा निर्णय ! ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, अखेर ‘तो’ पुल केला सुरू

या सर्वावर कोणती उपाययोजना करण्यात आली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. 
Thane-Nashik Highway: प्रशासनाचा मोठा निर्णय !  ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, अखेर ‘तो’ पुल केला सुरू

सध्या राज्यभरात अनेक महामार्गांवर वाहतूक कोंडी होत असलेली दिसून येत आहे. अशातच आता ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या सर्वावर कोणती उपाययोजना करण्यात आली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. 

ठाणे-नाशिक मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी प्रचंड ट्रॅफिक जॅम होत होता. त्यावर आता उपाय म्हणून  नव्या साकेत उड्डाण पुलाच बांधण्याच आलेला असून तो वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. या नव्या पुलामुळे ठाणेहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – India AI Impact Summit 2026: AI कडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलणार; पंतप्रधान मोदींनी मांडले भारताचे 'MANAV' व्हिजन
 
या मार्गावर आधी एक जुना साकेत पुल होता. मात्र पुलाची खूप दुरावस्था झाली होती. पुलाकडे जाणारे अनेक रस्ते अपूर्ण होते आणि मार्गिका अरुंद असल्याने वाहतूक मंदावत होती. विशेषतहा अवजड वाहनांमुळे मोठी कोंडी होत होती. या समस्येबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रश्न उपस्थित केला होता.

हेही वाचा – Vaishno Devi Mandir: वैष्णोदेवी मंदिरात व्हिडीओ बनवणे पडणार महागात; छुपा कॅमेरा वापरणाऱ्यांवर थेट… 

याशिवाय या मार्गावर दिवा अंडरपास परिसरात सध्या फक्त दोन लेन सुरू आहेत. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी दोन लेन सुरू करण्याचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे-नाशिक मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version