जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
सुलभ प्रसुतीसाठी जनावरांसाठी वापरलं जाणारं औषध माणसांसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या पाचपाखाडी भागात उघडकीस आलाय. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन या औषधाची बिलाशिवाय खरेदी करुन त्याची विक्री मानवी रुग्णांसाठी केली जात असल्याचं समोर आलंय.
ठाण्यातील आधार रुग्णालयात 19 सप्टेंबर रोजी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी या औषधाची विक्री झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी लाईफकेअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे, फार्मासिस्ट ललिता झिंझाड आणि औषध वितरक कंपनी मेसिन रेमिडीज इंडिया यांच्याविरोधात नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.