लिफ्टमध्ये अडकल्याने चिमुरडीने हात गमावला

लिफ्टमध्ये अडकल्याने चिमुरडीने हात गमावला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

लिफ्टमध्ये एकटा प्रवास करणे एका लहान विद्यार्थिनीच्या जीवावर बेतलंय. लिफ्टच्या दरवाजात 8 वर्षांच्या मुलीचा हात अडकून तो कोपरापासून तुटल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अर्चना थळे असं मुलीचं नाव असून ग्रीन इमारतीमध्ये ही घटना घडली. दरम्यान या मुलीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, लिफ्टमध्ये कर्मचारी नसल्याने ही घटना झाल्याचा आरोपी तिच्या आईने केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version