Thane Fire: मोठी बातमी! ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला आग; मोठं नुकसान, जिवीतहानी टळली

या आगीमुळे गावदेवी मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीमध्ये दुकानं तसेच गोडाऊन यांना जळून खाक झाल्याची माहीती समोर आली आहे. 
Thane Fire: मोठी बातमी! ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला आग; मोठं नुकसान, जिवीतहानी टळली

ठाण्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीमुळे गावदेवी मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीमध्ये दुकानं तसेच गोडाऊन यांना जळून खाक झाल्याची माहीती समोर आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, गावदेवी भाजी मार्केट पहाटेच्या वेळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक मार्केटमधून धुराचे लोट निघू लागले आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केलं. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकाने आणि विविध साहित्याची गोडाऊन आहेत. आगीची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

हेही वाचा- Thane Water cut: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, महापालिकेतर्फे काटकसरीचे आवाहन

आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्यामुळे मार्केटमध्ये लोकांची गर्दी नव्हती, ज्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version