Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका; स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी

Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका; स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी

ठाणे : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाल्याचे चित्र मंगळवारी सकाळी पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी लोकल 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत असल्याने ठाणे आणि दिवा स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. काल रात्री खरडी स्थानकात विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक मध्यरात्री 3 वाजता संपणार होता. मात्र तो आज सकाळी 6 वाजता संपला. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत होती. परिणामी, सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेले चाकरमानी फलाटावरच अडकून पडले. त्यामुळे महिला, पुरूष, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तोबा गर्दी या स्थानकांवर दिसून आली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार उघडकीस आला असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे. 

हेही वाचा : Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दुहेरी संकट! कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे मुसळधार पावसासह गारपीटीचा इशारा; पुढील 3 तास महत्त्वाचे, प्रशासन सतर्क

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version