जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ 24 तासांच्या आता सापडलं आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाळाचा शोध लावून, या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केले आहे.
भिवंडी येथील मोहिनी मोहन भुवर याचं हे बाळ आहे.या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून, बाळ त्याच्या आईकडे सोपवण्यात आले. ज्या बाळासाठी तक्रार आली होती, त्या व्यतिरिक्त आणखी चार मुलं सापडल्याची माहिती ठाणे पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.
बाळ सापडले असले, तरी या प्रकारानंतर सिव्हिलमधील रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.