सुपरस्टारला नियम मोडणं पडलं महागात

सुपरस्टारला नियम मोडणं पडलं महागात

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : तमिळ अभिनेता थलापती विजय याचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याचा हटके अंदाज आणि थ्रिलिंग ऍक्शन प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत असते. अलीकडेच तो बराच चर्चेत आला आहे. याचे कारण त्याचा कोणताही सिनेमा नसून त्याचे राजकारणात पदार्पण हे कारण आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता थलापती विजय हा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. अशातच आता तो वेगळ्या कारणाने अधिक चर्चेत आला आहे. कारण तो अडचणीत आला आहे. विजयने केवळ एक दोन वेळा नव्हे तर दोनपेक्षा जास्त ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तो अडचणीत सापडला आहे.यास्तही त्याला ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

सोमवारी (११ जुलै रोजी )थलापती विजय हा विजय मक्कल अयक्कमच्या सदस्यांची भेट घेण्यासाठी गेला होता. पनयूर येथे व्हीएमआय सदस्यांची भेट घेऊन परतताना त्याने प्रवासात काही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले त्यामुळे त्याला दंड भरावा लागणार आहे. या मागे कारणही तसेच होते. विजयला रस्त्यावर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला त्यामुळे चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी थलापती विजयने घाईघाईने दोनपेक्षा जास्त ठिकाणी सिग्नल तोडले. त्यामुळे त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विजयचा सिग्नल तोडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version