शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांच्या टीकेनंतर ठाकरे सरसावले असून मोदी पर्व संपत आल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई पालिकेत सत्ता मिळवायची आहे, अशाप्रकारे फडणवीसांनी बाळासाहेबांचे नाव पुढे करून मते मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फडणवीसांना उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे मोदी पर्व संपत असल्याची टीका केली आहे.
बाळासाहेबांच्या नावावर मते मागावी लागतायत.
फडणवीस यांना तशी कबुली द्यावी लागली आहे.
फडणवीस यांचे वक्तव्य सांगतेय की, मोदी पर्व संपत आलंय.
त्यांचे वक्तव्य सांगतेय की, मोदींच्या नावाने मते मिळत नाहीत.
आता नवीन नावे शोधून भाजपा मते मागतेय.
वापरा आणि फेकून द्या’ हीच भाजपाची रणनीती.
जनता भाजपाला मतपेटीतून धडा शिकवेल.
देवेंद्र फडणवीसांनी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कार केला. तसेच पुढील निवडणुकीत मुंबईचा महापौर आपलाच असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी केला. तसेच यावेळी फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तुफान फटकेबाजी करत शिवसेनेवर निशाणा साधला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.