शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. नवाजुद्दिन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता आहे. याच ‘ठाकरे’ चित्रपटाचं सध्या डबिंग सुरू आहे. नवाजुद्दीनने यासंदर्भात ट्विट केलं आहे, आणि ते ही मराठीत.
या ट्विटमध्ये नवाजने ”माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो, आजपासून डबिंगची सुरुवात केली आहे.” असं म्हटलं आहे.
माझा समस्त भावांनो आणि भगिणींनो, आज पासून डबिंग ची सुरुवात केली आहे…!!!
Here we start with the dubbing of #Thackeray pic.twitter.com/EVEuGHv3Kw — Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) October 4, 2018
बाळासाहेबांचा आवाज आणि वक्तृत्व ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक महत्त्वपूर्ण अंग होतं. त्यामुळे नवाजुद्दिनला डबिंगमध्ये बाळासाहेबांच्या आवाजाच्या जवळ पोहोचता येईल का अशी उत्सुकता आहे. जेव्हा नवाज बाळासाहेबांची भूमिका करणार असल्याचं स्पष्ट झालं, तेव्हा त्याला मराठी बोलता येईल का, अशी चर्चा सुरू होती. यावर नवाजने “मराठी ही माझी लाडकी भाषा आहे. मराठीवर माझं प्रेम आहे. हे पात्र साकारताना बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील आणि आशीर्वाद ही देतील.” असं उत्तर नावाजने उत्तर दिलं होतं. नवाजुद्दिनचं डबिंगसंदर्भातलं मराठी ट्विट हे त्याच्या याच मराठीप्रेमाची साक्ष देतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.