शिवरायांबाबत आक्षेपार्ह स्टेट्सवरून अकोल्यात तणाव

शिवरायांबाबत आक्षेपार्ह स्टेट्सवरून अकोल्यात तणाव

 अकोला , १७ जून २०२३, प्रतिनिधी :  अकोला शहरालगतच्या बाभूळगावात एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी आसिफखान पठाण नामक तरूणास अटक करण्यात आली आहे. गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आहे.

बाभुळगाव येथील आशिम खान पठाण नामक 25 वर्षे तरुणाने व्हाॅट्सअप वर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे स्टेटस ठेवले होते. याबाबत गावकऱ्यांनी आक्षेप घेत तरुणाला माफी मागण्या सांगितले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्यामुळे भीतीपोटी तरुण लपून बसला होता.

याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी आक्षेप घेत तरुणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन माफी मागण्या सांगितले. गावातील तरुण एकत्र आल्यामुळे भीतीपोटी तरुण लपून बसला होता. तो माफी मागण्यास तयार नव्हता. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version