टेम्पोच्या धडकेत टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये टेम्पोच्या धडकेत टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

योगेश गोवर्धने असे या तरुण कर्मचाऱ्याचे नाव आहे. टेम्पोच्या धडकेत योगेश जागीच ठार झाला आहे. 

या अपघातात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी घोटी टोलनाका बंद पाडला.

टोल कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, पोलीस कारवाईत चालकावर गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version