तेजस्विनी आणि बीग बींची खास भेट

तेजस्विनी आणि बीग बींची खास भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाच्या टीमची अमिताभ बच्चनसोबत नुकतीच भेट झाली. यावेळी संपूर्ण टीमने बॉलिवूडच्या शहेनशहासोबत खास गप्पा मारल्या. याच भेटीच्या निमीत्ताने तेजस्विनीने आपल्या आईचा एक व्हिडिओ बिग बींना दाखवला. हा व्हिडिओ तेजस्विनीसाठी खूप खास होता. कारण या व्हिडिओमध्ये तेजस्विनीच्या आईंसोबत म्हणजे ज्योती चांदेकर यांच्यासोबत खुद्द अमिताभ बच्चन होते.

1972 साली प्रदर्शित झालेल्या ‘एक नजर’ या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. त्या वेळेस ज्योती चांदेक या अवघ्या 16 वर्षांच्या होत्या. तेजस्विनी पंडितने बिग बींसोबतच्या या भेटीत त्यांना चित्रपटातील एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओत ज्योती चांदेकर आणि बिग बी यांचे संभाषण असलेले दृश्य होते. ज्योती चांदेकर यांनी स्वतः हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

स्वतःच्या आईचा व्हिडिओ अमिताभ यांना दाखवणे आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणे, हे सगळं वर्णन करण्यासारखंच आहे. त्याबाबत तेजस्विनी म्हणाली, ‘मी हे फार आधी प्लॅन केलं होतं की जेव्हा मी अमिताभजींना भेटेन तेव्हा मी त्यांना माझ्या आईसोबतचा त्यांचा हा व्हिडीओ नक्की दाखवणार. माझ्या आईची पण ही खूप इच्छा होती. पण त्यांना भेटायला जाताना मी थोडी अस्वस्थ होते. बिग बींकडे एवढा वेळ असेल का? इतके मोठे कलाकार किती लोक त्यांना भेटत असतील. माझा हा व्हिडिओ पाहण्यात त्यांना कितपत रस असेल मला माहित नव्हते. म्हणून मी तिथे पोहचल्यावर ‘ये रे ये रे पैसा’ बाबतची चर्चा करून झाल्यावर त्यांची परवानगी घेतली. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दाखवला. माझ्या आईने त्यांच्यासोबत एका चित्रपटात काम केलंय हे मी सांगितल्यावर त्यांना कौतुक वाटलं. त्यांना चित्रपटाचं नाव आठवत नव्हतं. पण हा एक सुंदर ‘नॉस्टॅल्जिया’ दिल्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद म्हटलं. व्हिडिओ पाहून त्यांना आनंद झाला.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version