जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी बुहप्रतिक्षित तेजस एक्स्प्रेस सोमवारपासून सुस्साट धावण्यास सज्ज झाली आहे.
मात्र, त्यापूर्वीच या देखण्या तेजसला कोणाची तरी नजर लागली आहे.
शनिवारी दिल्लीच्या दिशेने रवाना झालेल्या तेजस एक्स्प्रेसची काच फोडल्याचं मुंबई स्टेशनवर निदर्शनास आले.
अज्ञाताकडून तेजस गाडीची ही काच फोडण्यात आली असून, प्रशासन आणि RPF कडून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.