जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपुर
सरकारी काम 6 महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे. आता असं म्हणाची गरज नाही दिसून येत आहे. कारण पंढरपुरात तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी तहसील
कार्यालयातील जवळपास 48 हजार 53 फाईल्सचे रेकॉर्ड बनवलं असून तहसील कार्यालय हे झिरो पेंडन्सी झाले आहे.
महसूल विभागात अनेक कामे पेंडिंग राहतात. विविध दाखले घेण्यासाठी शासनानं ठरवून दिलेल्या मुदतीत दाखले मिळत नाहीत. तर अनेक वेळा हेलपाटे मारून कामे
होत नसल्याची ओरड नागरिकांची आहे. मात्र, यावर उपाय म्हणून पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महसूल विभागाला ” झिरो पेंडन्सी ” करण्याचे आदेश
दिले.
त्यानुसार कार्यालयामधील सर्व रेकॉर्डचे वर्गिकरण करून त्यातील जुने झालेले दस्त ऐवज नष्ट करणे, रद्दी झालेल्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ नये म्हणून मुदतीच्या
आत कागदपत्रे पुर्ण करून नागरीकांना देणे. तसंच कार्यालयातील प्रलंबितता शून्य करून कागदपत्रे रोजच्या रोज निर्गत करण्याचे काम येथील तहसिल कार्यालयाने हाती
घेतले.
कागदपत्रांचे वर्गीकरण करून प्रलंबित कागदपत्रे तपासून त्यावर निर्णय घेणे या दोन टप्यात अभियान राबविण्यात येणार आहे. येथील तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी 1
जूनपासून मोहिम हाती घेतली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.