टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल, २४ जानेवारीपासून टी-२० सीरिज

टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल, २४ जानेवारीपासून टी-२० सीरिज

टीम इंडियाने नववर्षाची विजयी सुरुवात केली आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला.

यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंडला दाखल झाली आहे.

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा भरगच्च असणार आहे. टीम इंडिया किंवी विरुद्ध ५ टी-२० मॅच, ३ वनडे आणि २ टेस्टची मालिका खेळणार आहे.

तब्बल २४ जानेवारी ते ४ मार्चपर्यंत टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये असणार आहे.

टीम इंडिया आधी न्यूझीलंड विरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ही एकूण ५ टी-२० मॅचची सीरिज असणार आहे. २४ जानेवारीपासून या टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचा २०२० या वर्षातील हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.

टी-२० सीरिजासाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे.

तर वनडे आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही.

टी-२० मालिकेसाठीचे नेतृत्व विराट कोहलीकडे असेल. तर कमबॅक केलेल्या रोहितकडे टीम इंडियाचे उपकर्णधारपद असणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सीरिजला शिखर धवनला दुखापतीला मुकावे लागणार आहे. टी-२० सीरिजसाठी शिखर धवनची निवड केली होती. दरम्यान धवनच्या जागी बदली खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही.

टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जस्प्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यांचे वेळापत्रक

२४ जानेवारी, पहिली टी-२०, ऑकलंड

२६ जानेवारी, दुसरी टी-२०, ऑकलंड

२९ जानेवारी, तिसरी टी-२०, हॅमिल्टन

३१ जानेवारी, चौथी टी-२०, वेलिंग्टन

२ फेब्रुवारी, पाचवी टी-२०, माउंट मोंगनूई

वनडे सीरिज

पहिली वनडे, ५ फेब्रुवारी, सिडन पार्क, हॅमिल्टन.

दुसरी वनडे, ८ फेब्रुवारी, इडन पार्कस ऑकलंड.

तिसरी वनडे, ११ फेब्रुवारी, बे ओव्हल, माऊंट मांगनुई

कसोटी मालिका

पहिली टेस्ट, २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी, पहिली टेस्ट, बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन

दुसरी टेस्ट, २९ फेब्रुवारी ते ४ मार्च, हेगले ओव्हल, क्राईस्टचर्च

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version