शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या, बंगल्यांच्या मुख्य दरवाज्यात काळी गुढी उभारून त्यांचा निषेध

शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या, बंगल्यांच्या मुख्य दरवाज्यात काळी गुढी उभारून त्यांचा निषेध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून शिक्षक परिषदेने काळी गुढी उभारली. मुंबईतील तब्बल 27 हजार शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. त्याच प्रकरणी, शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली.

शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सुभाष अंभोरे, बी डी घेरडे, प्रा. नरेंद्र पाठक व अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून मुख्य दरवाज्यात काळी गुढी उभारून आपला निषेध व्यक्त केला आणि तावडेंकडे काळी गुढी सुपूर्द केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version