मुख्याध्यापकांकडून शिक्षिकेचा विनयभंग

मुख्याध्यापकांकडून शिक्षिकेचा विनयभंग

जेथे ‘विद्या विनयेन शोभते’ असं शिकवलं जातं, त्याच शाळेमध्ये चक्क मुख्याध्यापकांनीच शिक्षिकेचा विनयभंग केल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. 

खामगाव तालुक्यातील रोहणा या गावातील एका शाळेत 31 वर्षीय शिक्षिका हजेरी रजिस्टर वर सही करत असतांना येथील मुख्यधयापक ‘बाहेकर’ यांनी तिचा विनयभंग केला. .

यावर शिक्षिकेने आक्षेप घेऊन विरोध केला असता ही घटना कोणाला सांगितली तर तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी सुद्धा दिली.

या संपूर्ण प्रकरणाबाबत शिक्षिकेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

शिक्षिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्यध्यापकाच्या विरोधात भा.दं.वि., 354 , 506 , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version